सध्या कोरोनाची परिस्थिती बघता वार्षिक परिक्षा घेण्यावरुन संभ्रम निर्माण झाला आहे. अशांतच ९ वी आणि ११ वी च्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषना केली आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमिवर हा निर्णत घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगीतले आहे.
गेल्या वर्षीच्या डिसेंबर आणि जानेवारीमध्ये कोरोना संसर्ग काहीसा मंदावला होता. त्यामुळे राज्यात विविधठिकाणी ५० टक्के ऊपस्थितीत शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे पुन्हा शाळा बंद कराव्या लागल्या. त्यामुळे पुन्हा शिक्षणप्रक्रिया अॉनलाईन पद्धतीने सुरु झाली.
विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला असल्याचे वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगीतले आहे. विविध तज्ज्ञ मंडळींशी सल्लामसलत करुन हा निर्णय झाल्याचेसुद्धा त्यांनी सांगीतले.
दरम्यान दहावी आणि बारावीच्या बोर्ड परिक्षांवरुनसुद्धा गोंधळ निर्माण झाला आहे. शिक्षण विभागाने परिक्षा अॉफलाईन होणार असल्याचेच जाहीर केले आहे. मात्र विद्यार्थ्यी आणि पालकांकडून या परिक्षा अॉनलाईन घेण्यात याव्यात अशी मागणी केली जात आहे.