“केंद्राने यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज” परमवीर सिंह प्रकरणावर मनसेची मागणी

11

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत. परमवीर सिंह यांच्या आरोपांमुळे संपूर्ण राज्यालाच धक्का बसला आहे. भाजोने यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यापाठोपाठ मनसेनेसुद्धा महाविकासआघाडी सरकारवर निशाना साधण्यास सुरुवात केली आहे. तसेच संपूर्ण प्रकरण गंभीर असून केंद्राने यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

“प्रसिद्ध ऊद्योगपती यांच्या घरासमोर स्फोटके ठेवणे. त्यानंतर मुख्यमंत्री ऊद्धव ठाजरे यांच्या जवळच्या पोलिस अधिकार्‍याचे नाव त्यामध्ये येणे. मुंबई पोलिस आयुक्ताची अचानक बदली करणे आणि त्यांनी थेट गृहमंत्र्यांवरच आरोप करणे हे सगळे गंभीर आणि दुर्दैवी आहे. त्यामुळे केंद्राने याप्रकरणी हस्तक्षेप करीत संपूर्ण प्रकरणाची ऊच्चस्तरीय चौकशी करावी.” अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

“सचिन वाझेंपुरता नर्यादित हे प्रकरण नक्कीच नाही. यामध्ये आणखी काही नावे समोर येतील जे महाराष्ट्रासाठी धक्कादायकच असेन.” असेसुद्धा राज ठाकरे यावेळी म्हणाले.

थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. अनिल देशमुखांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. परंतू तरिदेखील अनिल देशमुख आणि पर्यायाने महाविकासआघाडी सरकारच्या अडचणी अजून वाढ होण्याची शक्यता आहे.