मनसुख हिरेन प्रकरणात दोघांना अटक! निलंबीत पोलिस कॉन्सटेबल आणि सट्टेबाजाचा समावेश

5

मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यु प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. याअगोदर हिरेन प्रकरणाचा तपास एटीएसकडे होता. एटीएसने ठाण्यातुन दोघांना याप्रकरणी अटक केली अाहे. यापैकी एक निलंबीत पोलिस कॉन्सटेबल आहेत तर दुसरा आरोपी हा सट्टेबाजी व्यवसाय करणारा बुकी असल्याचे कळते. दोघांनाही ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

नरेश धरे(३१) आणि विनायक शिंदे(५५) अशी आरोपींची नावे आहे. नरेश धरे याचा सट्टेबाजीचा व्यवसाय असून तो बुकी आहे. विनायक शिंदे हा निलंबीत पोलिस कॉन्सटेबल आहे. एका प्रकरणात विनायक शिंदे हा कोठडीत होता. काही दिवसांअगोदरच त्याला पॅरोलवर सुटका देण्यात आली होती.

एटीएसने या अटकेसंदर्भात अद्याप कुठलिही माहिती दिलेली नाही. या दोघाही अरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. न्यायालयात यांच्या कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

संबंद्धित प्रकरणाचा तपास आता एनआयएकडे वर्ग करण्यात आला आहे. अंबानी स्फोटके प्रकरणांत एनआयए रोज नवनविन खुलासे करते अाहे. आता मनसुख हिरेन प्रकरणाच्या तपासात एनआयए कुठल्या बाबी समोर आणनार याकडेसुद्धा सगळ्यांचे लक्ष लागले आहे.