जमिनीचा मावेजा न मिळाल्यास आम्ही सॅनिटायझर पिऊन सामुहिक आत्महत्या करू

6

उस्मानाबाद जिल्ह्यातील वडगाव येथे एमआयडीसीने ३६० एकर जमीन संपादित केली आहे. त्यासाठी एकूण ५८ कोटी ९८ लाख १८ हजार १३७ रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला होता.

एमआयडीसीसाठी जमिनी संपादित केल्या आहेत, मात्र त्या जमिनीचा मावेजा न मिळाल्यास सॅनिटायझर पिऊन सामुहिक आत्महत्या करण्याची धमकी येथील शेतकऱ्यांनी दिली आहे. आद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी धमकीवजा इशारा दिला आहे.

१५ कोटी शेतकऱ्यांना मंजूर करून दिले असून केवळ २३ शेतकऱ्यांना हा निधी मिळाला आहे, उर्वरित ८० शेतकरी अजूनही मावेजा पासून वंचित आहेत. उर्वरित निधीच्या मागणीसाठी निवेदनही पाठवण्यात आले आहे.

येत्या २ एप्रिल पर्यंत उर्वरित निधी एक रकमी पूर्णपणे देण्यात यावी अन्यथा शेतकरी सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करतील, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर अनेक शेतकऱ्यांच्या सह्या सुद्धा घेण्यात आल्या आहेत.