वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील शेवसेना शहर प्रमुख गणेश बाबरे व शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती नितीन नेमाने यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड झाली आहे. या पार्श्वभूमिवरच कारंजा-मानोरा मतदारसंघाचे माजी आमदार तसेच कृषी ऊत्पन्न बाजार समिती कारंजाचे सभापती ना. प्रकाश डहाके यांचेहस्ते सत्कार करण्यात आला. कृषी ऊत्पन्न बाजार समिती कारंजा येथे या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शुंभूराजे देसाई यांच्यातर्फे गणेश बाबरे व नितीन नेमाने यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड करण्यात आली आहे. नऊ सदस्यीय या समितीवर निवड झाल्याबद्दल समस्त कारंजावासियांकडून गणेश बाबरे व नितीन नेमाने यांचे कौतुक होते आहे. गणेश बाबरे व नितीन नेमाने यांचा नेहमिच शहरातील सामाजिक कार्यात सहभाग असतो. जिल्हा समितीवर निवड झाल्यानंतर त्यांचेकडून कारंजावासियांच्या अपेक्षा अजूनच वाढल्या आहेत.
माजी आ. प्रकाश डहाके यांनी यावेळी गणेश बाबरे व नितीन नेमाने यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित केले. समाजात वावर असून समाजोपयोगी कार्यासाठी नेहमिच अग्रेसर असणार्यांची जिल्हा नियोजन समितीमध्ये निवड झाल्याने कारंजा मतदारसंघातील विकासकामांना निश्चितपणे चालना मिळेल असा विश्वास यावेळी प्रकाश डहाके यांनी व्यक्त केला. तसेच कार्यक्रनाचे आभारप्रदर्शन प्रसन्ना पळसकर यांनी केले.
अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे ऊपाध्यक्ष श्रीधर कानकिरड यांची यावेळी विशेष ऊपस्थिती होती. तसेच अरुण ताथोड, नगरसेवक नितीन गढवाले, नगरसेवक प्रसन्ना पळसकर, युवासेना शहरप्रमुख शंभुराजे जिचकार, सचिन थद्दानी, अशोक डोंगरदिवे, गोपाल येवतकर, दिवाकर ठाकरे यांच्यासह शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेंसचे कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.