बिहार विधानसभा निवडणूक होतेय. सुशांत सिंह प्रकरणामुळे कायम चर्चेत राहिलेले बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना JDU ने तिकीट तिकीट दिलेलं नाही. JDU कडून तिकीट मिळेल या भ्रमात असलेल्या गुप्तेश्र्वर पांडेना JDU ने तिकीट न दिल्याने राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय फासला असल्याचं बोललं जातंय. उमेदवारी न मिळाल्याने निवडणूक लढणार नाही अशी घोषणा गुप्तेश्वर पांडे यांनी केलीय.
JDU ने बुधवारी त्यांच्या सर्वच ११५ उमेदवारांची घोषणा केली. त्यामध्ये गुप्तेश्वर पांडे यांचं नाव नाही. पांडे बक्सरमधून निवडणूक लढतील अशी चर्चा होती. परंतु, बक्सरची जागा युतीत भाजपच्या वाट्याला गेल्याने भाजपने या जागेवर परशुराम चतुर्वेदी यांना उमेदवारी दिलीय. JDU ने उमेदवारी मिळाली नाही म्हणून निराश झालेल्या गुप्तेश्वर पांडे यांनी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं. नुकतच मोठं वाजत गाजत गुप्तेश्र्वर पांडे यांनी JDU मध्ये प्रवेश केला होतं. त्याची राजकीय महत्वाकांक्षा सुशांत सिंह प्रकरणात वेळोवेळी समोर आली होती.