एक राजा बिनडोक, दुसऱ्याचा इतर गोष्टींवर भर,आंबेडकरांची उदयनराजे संभाजीराजेंवर जहरी टीका

23

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यासोबतच त्यांनी राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे भोसले यांच्यावर सडकून टीका केली आहे. “एक राजा तर बिनडोक आहे, असं मी म्हणेन, आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा असं म्हणतात”  अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली आहे . त्याचबरोबर संभाजीराजे यांच्या वर टीका करत ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर जास्त भर देत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.

एक राजा बिनडोक आहे. दुसरे संभाजीराजे, त्यांनी आरक्षण प्रश्नावर भूमिका घेतली. पण, ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर अधिक भर देत आहेत, असं मला दिसतंय’ असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.  त्याचबरोबर पत्रकारांनी तुम्ही उदयनराजेंना अंगावर घेत आहात का ? असा प्रश्न विचारल्यावर मी अंगावर घ्यायला कोणालाच भिलेलो नाही. असं त्यांनी उत्तर दिलं. आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा, असे म्हणतात. भाजपने राज्यसभेत कसं पाठवलं तेच कळत नाही’ असं आश्चर्य देखील प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलं आहे.