संपूर्ण देशभरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. तसेच रुग्णसंख्या सुद्धा वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता आरोग्य सुविधा सुद्धा तोकड्या पडू लागल्या आहेत. मात्र अद्यापही मोदी सरकारकडून कर वसुली केली जात आहे. याच मुद्द्यावरून आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
देशात कोरोनाचं संकट वाढलेलं असतानाही नरेंद्र मोदी सरकारकडून अजूनही कर वसुली केली जात आहे. त्यावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. लोकांचा जीव जातोय, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली काही थांबताना दिसत नाही, असा संताप राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.
राहुल गांधी यांनी काल नरेंद्र मोदी यांना चिठ्ठी लिहून कोरोना संकट रोखण्यासाठी चार उपाय सांगितले होते. तर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदींवर थेट हल्ला करताना कोरोना रोखण्यात सिस्टिम नव्हे तर मोदी सरकार फेल गेल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर राहुल गांधी यांनी आज ट्विट करत थेट मोदींवर निशाणा साधला आहे. जनतेचा जीव जात आहे. पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली काही थांबलेली नाही, अशी टीका राहुल यांनी केली आहे. या ट्विटसोबत त्यांनी जीएसटी हा हॅशटॅगही वापरला आहे.