भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या कायम चर्चेत असतात. ते विरोधकांवर टीका करतात, धारेवर धरतात म्हणून ते चर्चेत असतात. मात्र, आता किरीट सोमय्या यांना धमकी मिळाल्याने चर्चेत आहेत.
किरीट सोमय्या यांनी मुलुंडचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांना पत्र पाठवून, धमकी मिळाल्याचे कळवले आहे. त्यादृष्टीने आवश्यक ती पावलं उचलण्याची विनंती देखील त्यांनी केली आहे.
१३ मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सॲप वर एक मेसेज सोमय्या यांना आला. ‘१ जून नंतर तुला घराबाहेर पडू देणार नाही, काय करतो बघ. मुलुंडला येऊन सांगतो तुला’ असे त्या संदेश मध्ये लिहिलं होता.
ही धमकी कोण पाठवली आहे? ते मी शोधू शकलो नाही. त्यामुळे आरोपीला शोधून काढण्यासाठी जे आवश्यक आहे, ते सर्व करा. असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.