परभणी प्रतिनिधी: उद्धव ठाकरेंचा पक्ष काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्याने वाचला असून उद्धव ठाकरेंनी काँग्रेस चे नेते राहुल गांधी व सोनिया गांधी यांचे पाय धुवावे व ह्या उपकाराची जाण उद्धव ठाकरे यांच्या सेनेने ठेवून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जागावाटप करताना लक्षात ठेवावी असे धक्कादायक विधान यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी केले.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष परभणी व राष्ट्रवादी काँग्रेस चे जिंतूर- सेलू विधानसभा अध्यक्ष प्रसाद बुधवंत, धनगर समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष अनंत कोरडे,कवडा सरपंच राजेश चव्हाण,माजी नगरसेवक नियाज खान, गफुर खान, माजी नगरसेवक अफसर बेग, सामाजिक कार्यकर्ते याया खान,अयुफभाई सदर,सय्यद मुस्तफा यांचा प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये जाहिर प्रवेश झाला.
यावेळी समवेत आ.वजाहत मिर्झा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सुरेश भैया नागरे, जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत,विशाल बुधवंत,शहराध्यक्ष बासू खान,सुधाकर नागरे व पदाधिकारी उपस्थित होते.
Source – Maharashtralive + https://maharashtralive.in/?p=88