कल्याण मधून उल्हासनगर, मुरबाड, नगरला जाणारी माणसे ज्या शहाड ब्रिज वरून जातात ते शहाड ब्रिज पूर्णपणे खंगलेल्या अवस्थेत आहे ब्रिजवर अगदी हातभर, गुडघाभर खड्डे पडलेले आहेत आणि तिथून गाडी चालवणे म्हणजे फार मोठी कसरत आहे कधी कधी तर चार चाकी गाड्यांचे चाक त्या खड्ड्यांमध्ये फसतात आणि गाडी अडकून पडते.
पंधरा-वीस दिवसाच्या पूर्वी त्या ब्रिजला एक मोठं भगदाड पडलं आणि थेट ब्रिजवरून खालचा रस्ता दिसू लागला. विशेषतः दुपारनंतर त्या ब्रिजवर फार मोठी गर्दी असते ट्रॉफीक असते आणि अगदी ब्रिजवर 60-70 गाड्या तरी उभ्या असतात. या ब्रिजवरून लहान मुलांना शाळेत सोडणारे व्हॅन, मोठमोठाली ट्रक्स, चारचाकी आणि दुचाकी गाड्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात येजा करतात.
तिथून जाणारे येणारे लोक अक्षरशः एकदा का ब्रिज चढला किंवा उतरला तर सुटका झाली असे बोलतात. या ब्रिजवरून जाणे आणि येणे हे फार मोठी रिस्क आहे. ब्रिजवर पडलेल्या खड्ड्यांमुळे लोकांना अनेक प्रकारचे मानेचे कमरेचे पाठीचे दुखणे सुद्धा उद्भवले आहे. अक्षरशः माणसे त्या ब्रिजवरून जीव मुठीत घेऊन जातात. मी सुद्धा त्याच ब्रिजवरून रोज येजा करतो, ब्रिज चढताना उतरताना आणि परतीच्या प्रवासामध्ये रोज मनात फार मोठी भीती असते. दुर्दैवाने याकडे कोणाचेच लक्ष नाही हे त्याहूनही वाईट असे आहे.