रिपब्लिकसाठी पैसे पुरविणारा हंसाचा माजी कर्मचारी अटकेत

7

रिपब्लिक टिव्ही, बॉक्स सिनेमा आणि फक्त मराठी चॅनलच्या टिआरपी घोटाळ्याची चौकशी गेली काही दिवसांपासून सुरू होती. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या 5 जणांपैकी तिघांनी हंसा अँनॅलिसिसच्या रॅकेटचा एक माजी कर्मचारी याचा भाग आहे असे उघड केले होते. रिपब्लिक टीव्ही पाहण्यासाठी पैसे पुरविणाऱ्या उमेश मिश्राला दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. तो ‘हंसा’ चा माजी कर्मचारी असून त्याला शुक्रवारी मुंबई गुन्हे गुप्त वार्ता विभागाने विरारमधून अटक केली.

रिपब्लिक टिव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संपादक अर्णब गोस्वामी यांची या प्रकरणी चौकशी होणार आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत या प्रकरणात अंधेरीतील बोमपेली नारायण मिस्त्री (४४), विशाल वेद भंडारी (२१), बॉक्स सिनेमाचे नारायण नंदकिशोर शर्मा (४७), फक्त मराठीचे शिरीष सतीश पत्तनशेट्टी (४४), आणि उत्तर प्रदेशातील विनय त्रिपाठीला अटक करण्यात आली आहे. मिश्रा यांच्या अटकेनंतर पोलिस आता दिनेश विश्वकर्मा, रॉकी व अन्य आरोपिंच्या शोधात आहेत.