अर्णबच्या चौकशीनंतर अटकेचा निर्णय घ्या : हायकोर्ट

17

टिव्ही चॅनल मधील टिआरपी घोटाळा काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी उघड केला होता. त्या घोटाळ्यात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर रिपब्लिकने हे प्रकरण सीबीआई यांच्या कडे वर्ग करण्यात यावं यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

त्यावर आज हायकोर्टात सुनावली झाली. रिपब्लिक ची मागणी मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. सोबतच अर्णब गोस्वामीला थेट अटक न करता, आधी त्याला समन्स द्या, असा निर्णय हायकोर्टाने दिला आहे. तसेच त्याच्या चौकशीनंतर अटकेचा निर्णय घेण्यात यावा, असेदेखील मुंबई हायकोर्टाने म्हटलंय.

रिपब्लिक चॅनेल तर्फे ज्येष्ठ वकील हरीश साळवे, तर मुंबई पोलिसांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयापुढे बाजू मांडली. या प्रकरणात ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ आणि ‘रिपब्लिक टीव्ही’ या वाहिन्यांना अवैधरित्या वाढीव टीआरपीचा लाभ मिळाला आहे. परमबीर सिंह यांनी 8 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात सविस्तर माहिती दिली होती.