राष्ट्रवादीत प्रवेश ठरला, एकनाथ खडसे मंत्री होणार ?

29

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती दिली. शुक्रवारी दुपारी दोन वाजता खडसे राष्ट्रवादीत दाखल होणार आहेत. खडसेंसोबत आता नेमके कोणकोण भाजप सोडून राष्ट्रवादीत जातील याबद्दल चर्चा आहे. खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना काय मिळणार असा प्रश्न विचारला असता, खडसेंचा पक्षप्रवेश हा सुखद क्षण असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसेंच्या अनुभवाचा पक्षाल फायदा होईल असंही ते म्हणाले.

राष्ट्रवादीने खडसे यांना मंत्रिपदाची ऑफर दिल्याची चर्चा माध्यमातून होत आहे. राष्ट्रवादी मार्फत राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदार म्हणून त्यांची नियुक्ती होऊ शकते. त्यानंतर खडसे यांना कृषी, जलसंपदा, अथवा गृहनिर्माण यांसारख मोठं खात मिळणार असल्याची चर्चा आहे. सध्या गृहनिर्माण मंत्रिपद जितेंद्र आव्हाड यांच्याकडे तर जलसंपदा मंत्रिपद खुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आहे. हे दोन्हीही राष्ट्रवादी पक्षाचे पहिल्या फळीतील नेते आहेत. त्यामुळे त्यांचे खाते काढून एकनाथ खडसे यांना दिली जातील का ? असाही प्रश्न आहे. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळणार असल्याचं कळतंय.