रुबाब ! रॉयल एनफिल्डची बहुप्रतिक्षित बाईक लाँच होणार; जाणून घ्या…

13

रॉयल एनफिल्ड कडून नव्या बाईकची लॉन्च डेट जाहीर करण्यात आलीय. मीटिओर 350 (Royal Enfield Meteor 350)  ही नवीन बाईक ६ नोव्हेंबर २०२० रोजी लॉन्च होत आहे.

Meteor रेंज ही नव्या जनरेशनचं प्रतिनिधीत्व करते. ही बाईक नव्या प्लॅटफॉर्म आणि इंजिनसह विकसित करण्यात आली आहे. नवीन मीटिओर 350 एका ग्लोबल प्रोडक्टच्या रुपात सादर केली जाईल. हेडलाईट आणि टेललाईटमध्येही बदल करण्यात आले आहेत. बाईकमध्ये नवीन डिव्हाइस कन्सोल सेट-अप आणि स्प्लिट सीट डिजाइन देण्यात आलं आहे. बाईकमध्ये टियर-ड्रॉप शेप्ड इंधन टॅन्क, ब्राईट कलर ऑप्शन, एलईडी लाईट आणि एका स्प्लिट-सीटचा समावेश करण्यात आला आहे. RE Meteor 350 ची किंमत 1.5 लाख ते 2 लाख रुपये इतकी असू शकते.

मीटिओर 350 मध्ये डबल-क्रॅडल चेसिसचा वापर करण्यात आला आहे. असं सांगितलं जातंय की, नवीन 350 सीसी इंजन पूर्वीपेक्षा जास्त पॉवर आणि टॉर्क निर्माण करेल. इंजिन 20.2 बीएचपी आणि 27 एनएम पीक टॉर्क निर्माण करु शकतं.