माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेले अनेक दिवस फडणवीस राज्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत होते. तसेच त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारीही स्वीकारली होती. त्यामुळे ते अनेकांच्या संपर्कात आले. आणि अखेर त्यांना कोरोनाने गाठलेच.
आतापर्यंत माझ्या जे जे कोणी संपर्कात आले आहेत, त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी, असा सल्लाही फडणवीसांनी संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून, मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे, ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी ही दिली आहे.