झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील राणा आणि अंजलीची जोडी चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत इतर पात्रांप्रमाणे ‘नंदिता वहिनीची’ भूमिका हि लोकांना जास्त प्रमाणात आवडली आहे. तिचे पात्र, संवाद आणि हटके स्टाईलमुळे ती लोकप्रिय झाली. सध्या या मालिकेत ट्विस्ट आला आहे. आपल्या वहिनीसाहेब यांची मालिकेत पुन्हा जोरदार एंट्री होत आहे. तिच्यासोबत सुरजही मालिकेत झळकणार आहे.
4 वर्ष आणि 1200 एपिसोडचा टप्पा पूर्ण करत नंदिता येतेय परत एकदा नवा ट्विस्ट घेऊन! कटकारस्थाने घेऊन ती पुन्हा येणार आहे. मात्र या वेळी नंदिताच्या भूमिकेत ‘माधुरी पवार’ असणार आहे. नंदिता हे पात्र सुरवातीला धनश्री काडगावकर साकारत होती. धनश्री काडगावकर गरोदर असल्याचं समजले आहे. त्यामुळे हे पात्र आता माधुरी पवार साकारणार आहे. माधुरी पवार ही एक प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी आहे.
आता सुरज आणि नंदिताला गोदाक्का आणि राणा दा घरात घेतील का? हे येणाऱ्या भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नंदिताच्या भूमिकेवर महाराष्ट्राने भरपूर प्रेम केलं. आता ही नवी नंदिता महाराष्ट्राला आवडते का हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे.