“सैराट” फेम ‘लंगड्या’ झळकणार या ग्लॅमरस अभिनेत्रीसोबत रुपेरी पडद्यावर

32

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटातून लोकप्रिय झालेला लंगड्या आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. लंगड्या म्हणजे तानाजी गळगुंडे हा ‘भिरकीट’ या चित्रपटातुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सैराटमध्ये परश्या, लंगड्या, सल्या यांची जोडी गाजली होती. या चित्रपटाच्या निमित्ताने तानाजी आणि मोनालिसा पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत.

‘पैंजण कानामध्ये छुनू छुनू वाजतेय’ या गाण्यात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री मोनालिसा बागल या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. गेले काही दिवस नवरात्री विशेष 9 रंगाचे फोटोशूट करून मोनालिसा सोशल मीडियावर चर्चेत होती. ड्राय डे, परफ्युम, गणू, झाला बोभाटा, टोटल हुबलाक अशा चित्रपट आणि मालिकेतून मोनालिसा बागल प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती.

‘भिरकीट’ चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखन अनुप जगदाळे यांनी केलं आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून चाहत्यांनी स्वागत आणि कौतुक केले आहे. या ‘भिरकीटचे’ मोशन पोस्टर पाहता तानाजी आणि मोनलिसा यांची जोडी नक्कीच धमाल करणार आहे असे वाटते.