बायकोचे विवाहबाह्य संबंध; नवऱ्याने घेतला गळफास

30

दुसऱ्याशी विवाहबाह्य संबंध ठेवल्याने बायकोच्या प्रियकरा कडून झालेल्या मारहाणीमुळे त्रासलेल्या नवऱ्याने आई वडिलांच्या घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केली आहे. या प्रकरणी मृताच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून सदरील प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. नवनाथ त्र्यंबक भोळे (६४) हे मुकुंदवाडी मध्ये संजय नगर येथे राहतात. त्यांचा मुलगा विलास (४२) पत्नीसोबत मुकुंद नगर याठिकाणी राहत होता. २६ ऑक्टोबर रोजी दुपारी विलास घरी गेला असता पत्नी गणेश मोरे या तरुणासोबत घरात आढळून आली. त्या तरुणाला विचारणा केली असता. पत्नीने तरुणाची बाजू घेऊन त्याला काय करायचे मी काहीही करीन. असा प्रतिप्रश्न नवऱ्याला केला. आणि प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला मारहाण केली.

त्यानंतर गणेश तेथून पळून गेला. यामुळे निराश झालेल्या विलासने आई वडिलांच्या घरी जाऊन गळफास घेतला. सहा महिन्यांपासून विलास निराश होता. पत्नीच्या अशा वागण्याने तो कंटाळला होता. सर्व हकीकत त्याने आई वडिलांना सांगितली होती. मात्र ह्या सगळ्या निराशेच्या भारत त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले.