सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ABVP चे आंदोलन

16

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षांमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विद्यापीठातील विविध विभागांतील परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं आहे. विद्यापीठाकडे याबाबत 14 हजारांपेक्षा जास्त तक्रारी आल्या आहेत. याच गोष्टींचा निषेध करत आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यापीठात आज राडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यापीठाच्या परिसरात तोडफोड देखील करण्यात आली.

उपकुलगुरू एन.एस.उमराणी यांना धक्काबुक्की सुद्धा यादरम्यान करण्यात आली. जोपर्यंत कुलगुरू बाहेर येत नाहीत, तोपर्यंत आम्ही जाणार नसल्याचही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलकांनी सांगितलं आहे. कुलगुरूच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे.

अभाविपचे महानगरमंत्री अनिल ठोंबरे म्हणाले की, “आजवर विद्यापिठाच्या कारभारा विरोधात आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवण्याचे काम केले आहे, आजवर आम्ही अनेक वेळा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचं काम केले आहे. आजही विद्यार्थ्यांसाठी आमच्या अनेक मागण्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर अजून विद्यापीठाने काही उत्तर दिले नाही, कोणी पुढे येऊन बोलण्यास ही तयार नाही. या विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. जोपर्यंत विद्यापीठाकडून याबाबत काही माहिती मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगितले आहे.