आज पासून बँकिंग क्षेत्रात नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज 2 नोव्हेंबर पासून बँकांना हे सर्व नियम बँकांना लागू होणार आहेत. या नवीन नियमांमध्ये बँकांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या ईज (EASE) अन्वये बँकिंगमधील सुधारणांतर्गत ग्राहकांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक शाखांच्या वर्गीकरणानुसार कामकाजाची वेळ एकसमान केली आहे. या वेळेची उद्यापासून अंमलबजावणी होणार आहे.
रहिवासी क्षेत्रातील बँकांची सकाळी नऊ ते दुपारी चार अशी वेळ असेल. मात्र, ग्राहकांसाठी सकाळी नऊ ते दुपारी तीन पर्यंतच वेळ असनार आहे. व्यापारी क्षेत्रातील बँकांची सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा अशी वेळ असून, ग्राहकांसाठी सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच पर्यंत बँक उघडी ठेवण्यात आली आहे. इतर व कार्यालयासाठी असलेल्या बँकांची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच असून ग्राहकांसाठीही सकाळी दहा ते पाच अशी राहणार आहे. जिल्हा तसेच शाखानिहाय बँकेच्या वेळेचा तपशील बँक ऑफ महाराष्ट्राच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. प्रत्येक शाखेने त्यांच्या कामकाजाच्या वेळा सूचना फलकांवर लिहून ते प्रथमदर्शनी भागात लावण्यात याव्यात अशा सूचना आहेत. शुक्रवारपासून नवीन वेळा लागू होत असून, ग्राहकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.