इस्रोची यावर्षीची पहिली मोहीम! अंतराळातुन शत्रूवर नजर ठेवणे शक्य

3

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) कडून आज श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून 10 सॅटलाईट लॉंच केली जाणार आहेत. इस्रोन वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार पोलर सॅटलाईट लाँच वेहीकलची (PSLV-C49) हि 51वी मोहिम असणार आहे. हे प्रक्षेपण यशस्वी झाले आहे. या नऊ उपग्रहांमध्ये 4 अमेरिकेचे, 4 लग्झेंबर्गचे आणि 1 लिथुआनियाचा आहे. हे एक अडव्हान्स रिसेट आहे. ज्याचा सिंथेटिक रडार ढगांच्या पलीकडेही पाहू शकतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रक्षेपणाबद्दल इस्रोचे कौतुक केले आहे. कोव्हिडच्या काळातही शास्त्रज्ञांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांनी कौतुक केले आहे. EOS-O1 अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटलाईट हे पृथ्वीवर लक्ष ठेवणारं सॅटलाईट आहे. याद्वारे शेती, जंगल, आपत्ती व्यवस्थापनासाठी मदत होणार आहे. कस्टमर सॅटलाईट्सला कमर्शियल कराराअंतर्गत लाँच करण्यात येणार आहे. हा करार न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि डिपार्टमेंट ऑफ स्पेससोबत करण्यात आला आहे.

ज्या ठिकाणाहून लॉचिंग पाहता येत ती गॅलरी बंद ठेवण्यात येणार आहे. या लाँचिंगचं लाईव्ह स्ट्रिंमिंग केलं जाणार आहे. सर्वांना ते इस्रोच्या वेबसाईट, युट्युब, फेसबुक आणि ट्विटवर पाहता येईल.