बिहार : काँग्रेसच्या जागा वाढतील, माणिकराव ठाकरे यांना आत्मविश्वास

1

आज बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. २४३ जागांसाठी तीन टप्प्यात बिहार विधानसभा निवडणूक पार पडली. आज मतमोजणी होत आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव असा सरळ सरळ मुकाबला आहे. बिहारचे मुख्यमंत्री कोण ? याचं उत्तर आज मिळणार आहे.

दरम्यान, कॉंग्रेसच्या या कामगिरीवर जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा सुरुवातीचा टप्पा आहे. काँग्रेसच्या जागा वाढतील. महागठबंधन मागे राहणार नाही. तेजस्वी यादव नेतृत्व करण्यास सज्ज आहेत. निकाल काय येतील याची वाट पाहिली पाहिजे, असं काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं आहे.