पुन्हा एकदा रानू मंडलचं नवं गाणं ऐकायला मिळणार !

5

रेल्वे स्टेशनवर गाणं गात आपलं पोट भरणारी रानू मंडल स्वतःच्या आवाजामुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली होती. तिच्या एका गाण्याच्या व्हिडिओने तिला रात्रीत ओळख मिळाली होती. त्यानंतर बॉलिवूडचा गायक हिमेश रेशमिया यांने आपल्या चित्रपटामध्ये गाण्याची संधी रानू मंडल ला दिली. आता पुन्हा रानू मंडलला एक नवीन चित्रपटासाठी गाणार आहे. अभिनेत्री दीपिका चिखलियाचा चित्रपट ‘सरोजिनी’मध्ये रानू मंडलला गाणं गाण्याची संधी मिळनार आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री दीपिका चिखलियाने याबाबत माहिती दिली आहे.

दीपिका ट्विट करून असं म्हटलं आहे की, ‘माझा चित्रपट ‘सरोजिनी’. धीरज मिश्रा यांनी लिहिल्या या चित्रपटात रानू मंडल गाणं गाणार आहे.’ या ट्विटसोबत दीपिका चिखलियाने रानू मंडलचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. सरोजिनी चित्रपट हा एक बायोपिक आहे. या चित्रपटात दीपिका चिखलिया सरोजनी नायडू यांची भूमिका साकारणार आहे.

‘मी रानू मंडल बोलत आहे. मी आता धीरज मिश्रासोबत ‘सरोजिनी’ चित्रपटातील सर्व गाणी गाणार आहे. मला आशा आहे की, मला तेच प्रेम आणि सन्मान मिळेल जे तुम्ही पहिल्यापासून देत आला आहात.’ असं रानू मंडल यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.