सोशल मीडिया मध्ये व्हॉट्सअँप हे सर्वाधिक वापरलं जाणारं अॅप्लिकेशन आहे. गेल्या काही दिवसांत व्हॉट्सअँपने नव-नवे फीचर्स युजर्ससाठी तयार केले आहेत. पुन्हा एकदा व्हॉट्सअँप युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. यापुढे व्हॉट्सअँपद्वारे शॉपिंग करणं शक्य होणार आहे. कारण, व्हॉट्सअँप मध्ये शॉपिंग बटण अॅड करण्यात येणार असून, कंपनीने याबाबत म्हटलं आहे की, व्यवसायांसाठी हे फिचर उपयोगी ठरू शकते.
या नवीन फीचरअंतर्गत यूजर्सना बिजनेस व्हॉट्सअँप अकाऊंट शेजारी शॉपिंग बटण दिसेल. हे बटण स्टोर आयकॉनप्रमाने असेल. व्हॉट्सअँप शॉपिंग बटणाचा वापर करण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअँप च्या कोणत्याही बिजनेस व्हॉट्सअँप अकाऊंटवर जावे लागेल. हे अकाऊंट कोणाचेही असू शकते. ज्यांच्याकडून तुम्ही कोणतंही प्रोडक्ट अथवा सर्व्हिस खरेदी केली असेल किंवा त्यासंबंधी मेसेज पाठवला-रिसिव्ह केला असेल, त्यांचे अकाऊंट बिझनेस अकाऊंट असू शकते.
बिझनेस अकाऊंटमध्ये तुम्हाला शॉपिंग आयकॉन असेल. त्यावर क्लिक केल्यानंतर समोरील अकाऊंटद्वारे विक्री होत असलेल्या प्रोडक्टची यादी दिसेल. त्यानंतर केवळ चॅटिंगच्या माध्यमातून तुम्ही वस्तूंची खरेदी करु शकता. फेसबुकच्या मालकीचे मेसेजिंग अँप व्हॉट्सअँपला भारतात पेमेंट सर्व्हिस सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता व्हॉट्सअँप वरुनही पैसे पाठवता येणार आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) व्हॉट्सअँप पे मंजूर केले आहे