भक्तांसाठी शिर्डीत उद्यापासून साई दरबार; ६ हजार भाविकांना साईंच दर्शन मिळणार

5

सोमवारी पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यास महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साई मंदिर दर्शनासाठी खुले केले जाणार आहे. आठ महिन्यांपासून सर्व मंदिरं बंद होती. त्यानंतर आता साईबाबा संस्थानने सोमवारपासून दररोज 6 हजार भाविक दर्शन घेऊ शकतील, अशी व्यवस्था केली असल्याची माहिती आहे.

मात्र, साई बाबांच्या दर्शनासाठी यायचे असल्यास, त्यासाठी भाविकांना आगाऊ ऑनलाईन बुकिंग करावे लागनार आहे. तसेच ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलेले असेल त्यांनीच शिर्डीत यावे, कोरोना प्रतिबंधंक सर्व नियम पाळावेत, असे आवाहन साईबाबा संस्थानने साई भक्तांना केले आहे. महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे उघडणार असल्याने भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय.