प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाला अटक

3

सुशांतसिंगच्या मृत्यू प्रकरणानंतर बॉलीवूडचे ड्रग्स रॅकेट बाहेर पडत आहेत. कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या घरावर एनसीबीने काल छापा टाकला आहे. त्यावेळी त्यांना 86.5 ग्राम गांजा सापडला. एनसीबीने सकाळी त्यांच्या घरावर छापा घातल्यानंतर दोघेही तातडीने एनसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. चौकशीनंतर एनसीबीने हर्ष आणि भारतीला अटक केली आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून हर्ष लिंबाचिया याची जवळपास 18 तास चौकशी केली गेली. एनसीबी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. भारती आणि हर्ष या दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या चौकशीमध्ये दोघांनीही अमली पदार्थ सेवन केल्याचे कबूल केले आहे. याशिवाय NCB ने अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा परिसरात देखील छापमारी केलेली आहे. भारतीच्या घरी संपूर्ण एनसीबी टिम पोहोचली होती. आणि इतर दोन टिम वेगवेगळ्या घरी पोहोचल्या होत्या.

भारतीच्या घरात गांजा सापडल्याने दोघांनाही प्रथम एनसीबीने ताब्यात घेण्यात आले. शुक्रवारी एका ड्रग पॅडलरला पकडण्यात आले होते. त्यांनतर भारती आणि हर्षच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्यांच्या घरी ड्रग्स सापडल्यानंतर त्या दोघांना एनसीबी कार्यालयात आणण्यात आले.