बीड : टँकर आणि कारचा भीषण अपघात; वंचितच्या जिल्हाध्यक्षांसह पाच जणांचा मृत्यू

3

बीड जिल्ह्यातील गेवराई जवळ भूषण अपघात घडला आहे. कार आणि ऑईल असलेल्या टँकर मध्ये झालेल्या अपघातात वंचित बहुजन आघाडीच्या पाच पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. वंचितचे पदाधिकारी कारने औरंगाबादकडे जात होते. त्यातच त्यांचा अपघाताने मृत्यू झाला आहे. लातूरचे वंचितचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांचा मृतात समावेश आहे. गेवराई बायपास जवळ झालेल्या अपघातातील सर्व पदाधिकारी लातूरचे रहिवासी आहेत. 

गेवराई पासून दोन किमी अंतरावर असणा-या बायपासजवळ कारचा भीषण अपघात घडला. अपघातात वंचित बहुजन आघाडीच्या पाच पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झालाय, आणि एक जण गंभीर जखमी आहे. अपघातात मृत्यू झालेले सर्व पदाधिकारी लातूरचे असल्याची माहिती आहे. ते लातूरहून बीड मार्गे औरंगाबादच्या दिशेने जात होते.

अपघात कारचालकाचा ताबा सुटल्याने झाल्याचं सागण्यात येत आहे. चालकाचा ताबा सुटल्याने कार ऑईल टँकरला जाऊन धडकली. या भीषण अपघातात पाच मृत्यू झाला आहे. एका जखमीवर बीडमध्ये उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त कारवरुन गाडीतून प्रवास करणाऱ्या व्यक्ती वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी असल्याचे स्पष्ट झाले.