मुंबई इंडियन्स संघाने कोलकाता नाईट रायडर्स ला ४९ धावांनी पराभूत करून संयुक्त अरब अमिरात येथे सुरु असलेल्या आयपीएल च्या १३ व्या सत्रात पहिला विजय मिळविला. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून कोलकात्याचा कर्णधार दिनेश कार्तिक ने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सच्या कर्णधार रोहित शर्माच्या झुंजार ८० (५०) खेळीमुळे २० षटकांत मुंबईच्या ५ गडी बाद १९५ धावा झाल्या. कोलकात्याकडून युवा गोलंदाज शिवम मावी ने सर्वाधिक २ बळी घेतले.
विजयासाठी १९६ धावांचा पाठलाग करताना कोलकाता संघाला २० षटकांत ९ बाद १४६ धावांपर्यंतच मजल मारता आली. कोलकात्याकडून पॅट कमिन्स ने सर्वाधिक म्हणजे ३३ धावांची खेळी केली. मॉर्गन, रसेल व सुनील नरीण सारख्या खेळाडूंना काहीहि विशेष कामगिरी करता आली नाही या सामन्यात म्हणून त्यांचा या सत्रातील पहिलाच सामना गमवावा लागला.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा ठरला सामनावीर.