गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटाचा स्क्रिन रायटर आणि अभिनेता जीशान कादरीविरोधात बुधवारी मुंबईतील अंबोली पोलिस स्टेशनमध्ये कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा तक्रार दाखल करण्यात आली आहे. फ्रायडे टू फ्रायडे एंटरटेनमेंट जीशानची कंपनी आहे. जीशानने 1.5 कोटींची अफरातफर केल्याचा दावा निर्माता जतीन सेठी यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. एका वेब सीरिजसाठी जीशानला देण्यात आलेल्या रकमेचा त्याने गैरवापर केल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
निर्माते जतिन सेठींनी सांगितले की, जीशान कादरीची कंपनी फ्रायडे टू फ्रायडे एंटरटेनमेंट आणि त्यांची कंपनी नाद फिल्म्स प्रॉडक्शन हाउस यांच्यात एका वेब सीरिजसाठी करार झाला होता. पण जीशानने माझी फसवणूक केली. वेब सीरिजमध्ये पैसे गुंतवतो असे सांगून माझ्याकडून पैसे उकळले आणि खरतर ते पैसे त्याने गुंतवलेच नव्हते. यामुळे मला कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
या तक्रारीत जीशान कादरीसह प्रियांका बसी या महिलेच्या नावाचाही उल्लेख आहे. त्यांनी सांगितले की, या फसवणुकीमध्ये प्रियांका बसी ही अभिनेत्रीही सहभागी होती. प्रियांका बसी अभिनेत्री आहेच पण ती जीशानसोबत दिग्दर्शनामध्येही सहभागी होती.