प. बंगालमध्ये भाजपने दोन अंकी जागा जिंकल्या तर मी ट्विटर वापरणं सोडेन : राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर

202

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे पश्चिम बंगालमधील राजकारण ढवळून निघालं आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधील अनेक नेते भाजप मध्ये प्रवेश करत आहेत. भाजपचे नेते अमित शहा यांनी बंगालची सगळी सूत्र हाती घेतल्याने पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल असा राजकीय अंदाज आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा असून त्यापैकी 200 हून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य भाजपनं समोर ठेवलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा हादरा देण्यासाठी भाजपने रणनीती तयार केली आहे.

मात्र, मुख्यमंत्री ममता बनर्जी यांचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी ट्वीट केलं आहे. मीडियाचा एक वर्ग भाजपच्या समर्थनाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. यावरून हे स्पष्ट होत आहे की भाजप 10 चा आकडा देखील पार करू शकणार नाही अशी स्थिती असून  भाजप जागा वाढवण्यासाठी संघर्ष करत आहे. भाजपने पश्चिम बंगालमध्ये चांगल्या जागा मिळवल्या तर मी ट्विटर सोडून देईन, असेही प्रशांत किशोर म्हणाले.