न्यायदेवता वाटते मला..
काढावी तुझ्या डोळ्यावरची पट्टी
बघ काय चाललय ह्या जगात
लोक किती झालेत निर्लज्ज आणि हट्टी.
वाटत नाही बघ तुझी भीती कोणाला
कारण तुझा न्याय झालाय तुझ्या सारखाच आंधळा
तूही एक स्त्रीचं आहेस ना?
तुला नाही का ग राग येत?
तुझ्याच मुलीवर अतिप्रसंग करून
हे लोक मुकाट फिरत आहेत.
एक वेळ अशी येईल, तुलाही नाहीत हे लोक सोडणार
तुझ्याही पदराला हात घालायला हे नाही घाबरणार.
मला सांग…
मग काय करणार तू?
लढणार की डोळे मिटून अशीच बसणार??
वेळ आहे तोवर डोळे उघड तू
या नराधमाना शिक्षा आताच दे तू
नाही होत मला सहन
हे अत्याचाराचे अंक
नाही कोण राजा इथे सारेच आहेत रंक
भाऊ बाप ह्यांनी सुद्धा केला आता कहर
आपल्याच मुली, बहिणी वरती आणला दुःखाचा कहर
न्यायदेवता डोळे उघड कृपा करून आता
नाहीतर मुलीला जन्मच घेऊ देणार नाही कोणती माता
- स्नेहांकित #३