भाजपच्या आमदाराला आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात नोटीस देण्यात आली आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
20 दिवसांपूर्वी ही नोटीस लाड यांना पाठवण्यात आली होती. त्यानंतर आता लाड यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. असे वृत्त टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनिने दिलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रसाद लाड यांनी 2009 साली मुंबई महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचे त्यांच्यावर आरोप आहेत. याबद्दल त्यांच्यावर 2014 साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रसाद लाड हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या या चौकशीला महत्त्व प्राप्त झाले आहे.