युपीएससी पूर्वपरीक्षा म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत देशभरात पूर्व, मुख्य, मुलाखत अशा स्वरूपात परीक्षांचं आयोजन केलं जातं. यावर्षी येत्या ४ ऑक्टोबरला पूर्वपरीक्षा होणार आहे. त्यापुर्वी कोरोना संक्रमनामुळे ही पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र न्यायालयाने युपीएससी पूर्वपरीक्षा पुढे शकल्यास नकार दिला आहे.
देशात सध्या 9 लाख 40 हजार 705 रुग्ण उपचार घेत आहेत. देशात काल एक हजार 181 कोरोना रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे देशभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे कोरोना रोगाच्या संभाव्य धोका टाळण्यासाठी ह्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र, न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने त्या फेटाळल्या. ज्या उमेदवारांचा परीक्षा देण्याचा हा शेवटचा प्रयत्न आहे. त्यांच्यासाठी नियम काही प्रमाणात शिथिल करता येतात का ते पहा, असे आदेशही न्यायालयानं यूपीएससीला दिलेत. गेल्या सोमवारी याबाबत शपथपत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने यूपीएससीला दिले होते.