आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन आहे. त्यानिमित्ताने दरवर्षी विद्यापीठ परिसर गर्दीने फुलून जातो. मात्र यंदा कोरोना महामारीमुळे सभा, मिरवणूक, पदयात्रा, रॅलीला आणि इतर कार्यक्रमाला पोलिस आयुक्तांनी परवानगी दिलेली नाही. अनुयायांना घरूनच अभिवादन करण्याची विनंती पोलीस प्रशासनाने केली आहे.
विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयात मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. कोरोनामुळे मागील नामविस्तार दिन साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
तरीही गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. त्यासाठी पोलिस नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे.