“पुन्हा येईन, पुन्हा येईन” असे म्हणता म्हणताच महाविकास आघाडीचे पाच वर्ष निघून जातीन आणि सरकार पाडण्याचे भाजपचे स्वप्न स्वप्नच राहील अशी टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रसचे नेते जयंत पाटील यांचा महाराष्ट्रभर विशेष दौरा सुरु आहे. ११ फेबृवारी रोजी जयंत पाटील जळगावात असणार आहे. जयंत पाटलांच्या या दौर्यासाठी जळगाव जिल्ह्यात जय्यत तयारी सुरु आहे. दौर्याच्या आयोजनासाठीच विशेष बैठकीचे आयोज करण्यात आले होते. यावेळीच नाथा भाऊंनी फडणवीसांना लक्ष करत ही टीका केली आहे.
महाविकास आघाडीचे सरकार हे मजबूत सरकार आहे. पाचही वर्ष हे सरकार टीकणार आहे. त्यामुळे पुन्हा येईन असे म्हणणारे नुसत पुन्हा येईन असे म्हणतच राहणार आणि बघता बघता महाविकास आघाडी आपला कार्यकाळ पूर्णसुद्धा करेन.
एकनाथ खडसे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीसांना विशेष लक्ष केले. “पुन्हा येईन” म्हणानार्यांच्या अहंकारामुळेच राज्यातून भाजपचे सरकार गेले. कोण चागंले काम करतो आणि कोण वाईट काम करयो याकडे जनतेचे लक्ष असतेच. असेदेखील एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.
आपल्यावर कोण टीका करतो याकडे लक्ष देत बसायचे नाही. पक्षविस्तारासाठी कार्यकर्त्याने कटिबद्द असले पाहिजे. जयंत पाटलांचा जळगाव दौरा ईतर जिल्ह्यांपेक्षा विशेष करुन दाखवायचा आहे. कार्यकर्त्यांना संबोधित करतांना खडसे बोलत होते. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी व जिल्हाभरातील राष्ट्रवादी कॉंग्रसचे नेते पदाधिकारी उपस्थित होते.