शार्जील उस्मानीवर पुण्यातील स्वारगेट पोलीस स्थानकात चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वारगेट पोलीस स्थानकाच्या हद्दीत गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी शनिवारी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
शार्जील उस्मानी सध्या महाराष्ट्राबाहेर आहे. तो बिहार, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करु, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करुन माहिती दिली.
पुण्यात 30 तारखेला झालेल्या एल्गार परिषदेत शार्जील उस्मानीने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची व्हिडीओ क्लिपिंग पोलिसांनी तपासली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.अस गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे.