सुशांत सिंह राजपूत प्रकरण : एम्सचा रिपोर्ट आला; ‘हे’ आहे मृत्यूचं खरं कारण

31

AIIMS म्हणजेच इंडिया इंस्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या बहुप्रतीक्षित सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील अहवाल सादर केला आहे. डॉक्टरांच्या एका पॅनलने हा अहवाल सादर केला. या अहवालानुसार, सुशांत सिंह राजपूतची हत्या झालेली नसून ती आत्महत्याच असल्याचं म्हटलं आहे. 

डॉक्टरांनी दिलेल्या या अहवालामुळे या प्रकरणाला कोणतं वळण मिळतं हे येणाऱ्या काळात आपल्याला कळेल. सुशांतने आत्महत्या केली तर त्या मागचं नेमकं कारण काय? सुशांतला आत्महत्या करण्यास कुणी प्रवृत्त केलंय का? परंतु, अहवालासंदर्भात अद्याप सीबीआयकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळाली नाही.

सुशांतचा मृत्यू आत्महत्या आहे. हे स्पष्ट झाले आहे. असे एम्सच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी सांगितलं. त्याच्या अंगावर गळफासाशिवाय कोणत्याही खुणा नव्हत्या. तसेच विरोध केल्याच्या कोणत्याही खुणा आढळल्या नसल्याचं गुप्ता यांनी एएनआय या प्रसिद्ध वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.