हाथरस येथील बलात्काराच्या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि नेत्या प्रियंका गांधी दोन दिवसांपूर्वी हाथरस येथे गेले होते. यावेळी युपी पोलिसांनी प्रियंका गांधींसोबत गैरवर्तन करणारा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
फोटोत प्रियांका गांधी स्वत: रस्त्यावर उतरल्या आणि लाठीचार्ज रोखण्याचा प्रयत्न करतात. तेंव्हा एक पोलीस कर्मचारी प्रियंका गांधी यांना रोखण्यासाठी त्यांचा कुर्ता खेचताना दिसत आहे. या प्रकाराचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून यावर जोरदार टीका होत आहे.
यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तो फोटो ट्वीट करत योगी सरकारला संतप्त सवाल केला आहे, योगीजींच्या राज्यात महिला पोलीस नाहीत का ? असे ते म्हणाले. उत्तरप्रदेश पोलीसांनी नुकतेच काँग्रेस नेते राहुल राहुल गांधी यांना धक्काबुक्की केल्याची घटना होती. त्यातच आता प्रियंका गांधी यांच्याशी गैरवर्तन करण्यात आलंय, त्यामुळे संपूर्ण देशातुन योगी सरकारच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे. काँग्रेस पक्षाने योगी सरकार विरोधात तीव्र आंदोलने सुरू केली आहेत.