संजय राठोडांच्या “त्या” दौर्‍यावरुन तापले राजकारण

32

पुजा चव्हान या टीकटॉकस्टार तरुणीच्या आत्महत्या प्रकरणांत वनमंत्री संजय राठोड यांचे नाव पुढे आले होते. विरोधी पक्षात असणार्‍या भाजपने संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. संजय राठोडसुद्धा याप्रकरणी मौन बाळगुन असून ते १५ दिवसांपासून नॉट रीचेबल होते. अखेर आज सर्वांसमोर येत बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी याठिकाणी जाऊन दर्शन घेण्याचा निर्णय त्यांनी केला. आता या दौर्‍यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

पोहरादेवी हे वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील ठिकाण आहे. बंजारा समाजाचे महंत याठिकाणी असतात. त्यामुळे पोहरादेवीस बंजारा समाजाचे श्रद्धास्थान मानले जाते. संजय राठोड बंजारा समाजातील मोठे नेते आहेत. पुजा चव्हान प्रकरणांतसुद्धा समाज त्यांच्या पाठीशी ठामपणे असल्याचे स्पष्ट होते. परिणामी संजय राठोड येणार म्हणून राठोड समर्थकांनी पोहरादेवी याठिकाणी प्रचंड गर्दी केली होती. आणि याच मुद्द्याला हेरत संजय राठोड व शिवसेनेवर टीका केली जात आहे.

पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड यांनी काहीही भाष्य केलेले नाही. सर्वप्रथम त्यांनी मंदिरात सपत्नीक जाऊन दर्शन घेतले. यावेळी मोठ्यासंख्येने कार्यकर्ते जमले होते. फीजीकल डीस्टंन्सींग, मास्क कोरोनाच्या या नियमांना पार धाब्यावर बसवल्याची परिस्थिती याठिकाणी होती. यावरुन भाजप नेते राठोड यांच्यावर टीका करत आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव ऊपाध्ये यांनी यावर ट्वीट करत मुख्यमंत्र्यांनाच सवाल केले आहे. तर ईतके दिवस संजय राठोड कुठे होते असा सवाल प्रविण दरेकर य‍ांनी केला आहे.

.संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सोपवला आहे. पोलिस चौकशीस समोर जाण्याचीसुद्धा त्यांची तयारी आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरुन मात्र सेनेत दोन गट पडल्याचे चित्र आहे. संजय राठोड यांनी पोहरादेवी याठिकाणी शक्तीप्रदर्शन करत समाज आपल्या पाठीशी असल्याचे दाखवले आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या हा ऊद्धव ठकारेंसाठीचा संदेश असल्याचेसुद्धा राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.