महाराष्ट्र सरकार, पोलीस, ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा हा तर डाव – संजय राऊत

13

पहिल्या दिवसापासून महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र पोलिस आणि ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचं षडयंत्र रचल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. यामुळे सुशांत सिंग ला न्याय मिळाला तर नाही. पण, सगळे मिळून सुशांत ला सुद्धा बदनाम करत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

पहिले मुंबई पोलिसांवर विश्वास नव्हता. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सिबिआय पाठवली. तरीही यांना विश्वास नाही. त्यावर आता कुठे जाऊ शकत असाल तर बघा. इंटरनॅशनल कोर्ट आहे. युनो आहे. असं म्हणत त्यांनी शलाजोडीतून भाजपला फटके दिले.

सुशांत सिंह चा मृत्यू दुःखदायक आहे. त्याचा योग्य तो तपास मुंबई पोलिसांनी केला. त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. AIIMS म्हणजेच इंडिया इंस्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या बहुप्रतीक्षित सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील अहवाल सादर केला आहे. डॉक्टरांच्या एका पॅनलने हा अहवाल सादर केला. या अहवालानुसार, सुशांत सिंह राजपूतची हत्या झालेली नसून ती आत्महत्याच असल्याचं म्हटलं आहे.  हा अहवालवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी बातचीत केली, तेंव्हा ते बोलत होते.