सोशल मिडियाचा आधार घेऊन करण्यात येत असणार्या कुरापती, त्यासंबंद्धी वाढणार्या तक्रारी यांचा विचार करता, केंद्र सरकारने नुकतेच सोशल मिडियासाठी काही नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये काही नियमांचा समावेश आहे. ज्यांचे पालन सोशल मिडियासंबंद्धीत सर्व कंपन्यांना करायचे आहे. या नियमांचे पालन न केल्यास संबंद्धित कंपन्यांवर कारवाई होऊ शकते.
केंद्रित माहिती व प्रसारण मंत्री यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत यांसंबद्धी माहिती दिली आहे. जारी केलेल्या टॉप १० गाईडलाईनपैकी एका गाईडलाईनचा व्हॉट्सअपवर थेट परिणाम होणार आहे. “सोशल मिडियावर एखादा मेसेज टाकला असता तो कुणी टाकला आणि कुठुन अोरीजनेट झाला” तक्रार आल्यास ही माहिती कंपनीला सरकारला द्यावी लागणार आहे. परंतू व्हॉट्सअपच्या एण्ड टु एण्ड ईन्स्क्रीप्शन पॉलीसीमुळे हे माहिती मिळवणे शक्य नसल्याचे व्हॉट्सअपने म्हटले आहे.
व्हॉट्सअपने याअगोदरसुद्धा काही स्पष्टीकरणे दिली आहे. एण्ड टु एण्ड ईन्स्क्रीप्शन असल्यामुळे मेसेज कुठुन आला आणि कुणी केला ही माहिती मिळवणे अशक्य आहे. केंद्र सरकारने याअगोदरसुद्धा अशी मागणी केली होती. मात्र आम्ही तेव्हाही हे स्पष्ट केले होते. असे व्हॉट्सअपच्यावतीने सांगण्यात आले आहे. परंतू याअगोदर सरकारने मागणी केली होती. मात्र आता थेट नियम करण्यात आला आहे. त्यामुळे या नियमाचे पालन करणे कंपनीस अनिवार्य होणार आहे. परिणामी व्हॉट्सअप भारतात बंद होणार का? यावर कुठलेही स्पष्टीकरण अद्याप आलेले नाही.
व्हॉट्सअपची मालक असणारी कंपनी फेसबुकने यासंबंद्धी स्पष्टीकरण दिले आहे. भारतातील नविन गाईलडलाईनचा आम्ही अभ्यास करत आहोत. आमच्या युजर्सच्या सेफ्टी आणि प्रायव्हसीसाठी आम्ही कटीबंद्ध असल्याचे फेसबुकने सांगीतले आहे.
व्हॉट्सअपने सरकारकडे आपले गार्हाने मांडले आहे. मात्र सरकारने विचारलेल्या प्रश्ना़ची ऊत्तरे देणव कंपन्यांना बंधनकारक असेल असे सरकारने ठणकावले होते.
व्हॉट्सअप हे भारतातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल मिडिया माध्यम आहे. त्यामुळे युजर्सचेसुद्धा आता पुढे काय होणार याकडे लक्ष लागले आहे.