दि. १ मार्चपासून राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाना साधला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्ह वरुनसुद्धा त्यांना ऊपरोधक टोला लगावला आहे.
कोरोनाचा कहर सुरु झाल्यापासून मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे फेसबुकद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधत आहे. मुख्यमंत्र्यांच्या या फेसबुक संवादावरुन विरोधकांनी त्यांच्यावर अनेकदा टीकासुद्धा केली आहे. २१ फेबृवारीलासुद्धा मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी फेसबुक लाीईव्हच्या सहाय्याने संवाद साधला. या फेसबुक लाईव्हवरुन नेटकर्यांनी मुख्यमंत्र्यांना चांगलेच ट्रोल केले. “माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहचतोत. पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहचत नाहीये” असे ऊद्धव ठाकरे संवादादरम्यान म्हणाले होते. हेच वाक्य हेरत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
सरकार केवळ फेसबुक लाईव्हमध्ये मग्न आहे. परंतू तरिदेखील २१ तारखेचे लाईव्ह ऊत्तम होते. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहचतोय, परंतू तुमचा माझ्यापर्यंत पोहचत नाहीये. गेल्या सव्वा वर्षापासून आम्ही हेव तर सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. असे फडणवीस म्हणाले. कोरोनावरुनसुद्धा फडणवीसांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
देशातील लोकसंख्येत महाराष्ट्रची लोकसंख्या ९ टक्के आहे. मात्र देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येतील ३३ टक्के रुग्ण हे महराष्ट्रतील आहे. असेसुद्धा फडणवीस यावेळी म्हणाले.