पाकिस्तानची नवी खूसपटं, आता बासमती तांदळावरून भारताशी भांडणार

17

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये नेहमीच तणावपूर्ण संबंध राहिले आहेत. नेहमी काश्मीर मुद्दयावरून भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणारा पाकिस्तानने भारतासोबत वाद घालण्यासाठी नवीन कारण शोधले आहे. पाकिस्तान आता भारतासोबत बासमती तांदळासाठी भाडणार आहे. आपण युरोपीय यूनियनमध्ये जिओग्राफिकल आयडेंडिफिकेशन (GI) टॅगसाठी भारताच्या दाव्याचा विरोध करणार असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचे आर्थिक सल्लागार अब्दुल रजाक दाऊद यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

गंगा नदी आणि हिमालयाच्या मैदानी प्रदेशांत तयार होणाऱ्या बासमती तांदळाचा स्वाद आणि सुगंध जगभरात प्रसिद्ध आहे. भारताच्या हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि पंजाब सारख्या राज्यांत बासमतीची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. नुकतीच मध्य प्रदेशनेही जीआय टॅगची मागणी केली होती. मात्र, पंजाबसारख्या राज्यांनी याला विरोध केला होता. भारत दरवर्षी जवळपास 33 हजार कोटी रुपयांचा तांदूळ निर्यात करतो.