भौतिकशास्राचा नोबेल पुरस्कार जाहिर, ‘हे’ आहेत मानकरी

19

जगातील सर्वात प्रतिष्टीत समजला जाणारा नोबल पुरस्कार जाहिर झाला आहे. भौतीकशास्रासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यावेळी हा पुरस्कार तीन शास्रज्ञांना विभागून देण्यात येणार आहे. भौतिकशास्रात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलंय. रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल आणि एन्ड्रिया गेज या 3 शास्रज्ञांचा या पुरस्कारानं गौरव करण्यात आला आहे.

या तिघांनाही 11 लाख डॉलरच्या रकमेसह सुवर्णपदक दिलं जाणार आहे. स्वीडनच्या स्टॉकहोममधून आज या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. मागील वर्षी भौतिकशास्रातील नोबेल हा कॅनाडामधील शास्रज्ञ जेम्स पीबल्स यांना देण्यात आला होता. त्यांनी बिगबँगनंतरच वेळेवर संशोधन केलं होतं. याशिवाय अंतराळवीर मिचेर मेयर आणि डिडियर कुएलोज यांना आपल्या अंतराळाबाहेरचा ग्रह शोधण्यासाठी सन्मानित करण्यात आलं होतं. 2020 च्या वैद्यकीय विभागातील नोबेल पुरस्कार (Nobel Prize) अमेरिकेचे हार्वे जे अल्टर, चार्ल्स एम राईस आणि ब्रिटिश संशोधक मायकल ह्यूटन यांना देण्यात आला आहे