‘आपला कांदा , आपलाच भाव’ राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे राबविण्यात येणार मोहीम

16

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या धरसोड वृत्तीमुळे जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याला कायमस्वरूपी हक्काची बाजारपेठ मिळवणे आजपर्यंत शक्य झालेले नाही. देशात कांद्याचे ठोस असे कुठलेही धोरण ठरलेले नाही. 

यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे ‘आपला कांदा, आपलाच भाव’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेची सुरवात सोमवारी (ता. १५) लासलगाव (जि.नाशिक) येथून करण्यात आली.

याबाबत सातत्याने जनजागृती करण्यात येणार असून, सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख, लोकप्रतिनिधी, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री या सर्वांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद साधत मोहिमेचे स्वरूप व दिशा काय असेल, हे स्पष्ट केले.

यावेळी संघटनेचे महेश ठाकरे, सोमनाथ गिते, विलास दौंड, रवींद्र पगार, गौरीलाल पाटील, सजन सानप, वाळिबा गायकवाड आदी उपस्थित होते.