चंदा कोचर यांना मोठा धक्का, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

2

सर्वोच्च न्यायालयाने चंदा कोचर यांना मोठा धक्का दिला आहे. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या बडतर्फ करण्याच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. दरम्यान, गेल्यावर्षी चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ पदावरून हटवण्यात आल्यानंतर या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायलयाने फेटाळली आहे. ‘आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास इच्छूक नाही आहोत. हा बँक आणि नियोक्त्यादरम्यानचा खाजगी करार आहे’, असे सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे. 

आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदावरून हटवण्याविरोधात चंदा कोचर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर्षी मार्चमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळली होती. त्यानंतर चंदा कोचर यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. मात्र, उच्च न्यायालयाने देखील चंदा कोचर यांची याचिका फेटाळली आहे.