शिवसेनेला जब्बर धक्का, नाना पटोलेंच्या उपस्थितीत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

346

पक्षांतराच्या घटना नवीन नाहीत. पण, राज्यातील कोरोना स्थिती आणि अपुरी असलेली वैद्यकीय साधने याच्याशी राजकीय नेत्यांना काहीही सोयरसुतक नाही. असं दिसून येतंय.

वसई येथील शिवसेना नेते विजय पाटील यांनी शिवसेनेला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात विजय पाटील यांनी २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या उपस्थित विजय पाटील यांनी काल काँग्रेस पक्ष प्रवेश केला. विजय पाटील यांनी दोन वर्षांतच काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. विजय पाटील यांनी 2019 मधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवबंधन हाती बांधले होते.

वसई विरार महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विजय पाटील यांच्या रूपाने शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे मानलं जात आहे, वसईत मोठ्याप्रमाणत असलेल्या मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाचे विजय पाटील यांना मोठं पाठबळ असल्याची माहिती आहे.