महेश मांजरेकरांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

14

सोलापूर-पुणे महामार्गावर समोरच्या वाहनचालकाने अचानकपणे ब्रेक दाबल्यामुळे पाठीमागून येणारी काही वाहने एकमेकांना धडकली. यात एक कार महेश मांजरेकरांची होती. कारला धडक बसल्यामुळे मांजरेकर गाडीतून उतरले आणि त्यांनी एका व्यक्तीला मारहाण करण्यास सुरुवात केली

अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर एका व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाल्याचं सांगण्यात येत आहे.यवतच्या पुढे एक किलोमीटर अंतरावर एक गाडी ( महेश मांजरेकर यांची) सतत त्यांना ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न करत होती. त्यातच सर्वात पुढच्या वाहनाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागील सगळ्या गाड्यांना एकमेकांची धडक बसली. 

मांजरेकरांनी मारहाण केल्यानंतर संबंधित व्यक्तीने यवत पोलीस ठाण्यात मांजरेकरांविरोधात तक्रार दिली आहे.