पुणे शहरातील श्री मुकुंद भवन ट्रस्टच्यावतीने ५० लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ट्रस्टी श्री. पुरुषोत्तम लोहिया यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पुण्याचे जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी संतोष देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला.
डॉ.गोऱ्हे यांनी ट्रस्टमार्फत करत असलेल्या कामाचे कौतुक केले. या ट्रस्टचे काम माणुसकी सुदृढ करण्यासाठी आहे. हे नक्कीच वाखाणण्याजोगे आहे, असेही डॉ गोऱ्हे यांनी सांगितले.
यासाठी डॉ शैलेश गुजर सहजीवन ट्रस्ट यांनी यासाठी पुढाकार घेतला त्याबद्दल डॉ. गुजर यांचेही कौतुक डॉ. गोऱ्हे यांनी केले. यावेळी पुरुषोत्तम लोहिया, आदित्य लोहिया, मदन जैन, परिवर्तन संस्थेचे डॉ. शैलेश गुजर, डॉ. प्रीतम शहा हजर होते.